सीधे मुख्य सामग्री पर जाएं
विठोबाची महापूजा बघतांना मला त्याच्या अंगावर असलेल्या खुणा प्रत्यक्ष बघायच्या होत्या; परंतु विठोबाची मूर्ती माझ्यापासून ६-७ फुटांवर असल्याने त्या मला दिसत नव्हत्या. तेव्हा मी देवाला मनात म्हटले, `तुझ्या अंगावरच्या खुणा मला कशा काय दिसणार ?’ त्या वेळी `तू त्या सूक्ष्मातून बघ’, असे आतून उत्तर आले. त्यानंतर मी विठोबाच्या मूर्तीवर मन एकाग्र करू लागले. मूर्तीजवळ जातांना खूप आनंद होत होता. ज्या वेळी मी आणखी खोल जाऊ लागले, त्या वेळी मन एकदम शांत झाले. (सूक्ष्म-चित्राचे आकृतीतील क्रमांक कंसामध्ये घातले आहेत.)
१. विठोबाच्या अनाहतचक्राशी मोठे निळे विष्णूपद जाणवले. (५)
२. छातीवर भृगू ऋषींनी मारलेल्या लाथेचा अंगठा रुतल्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाभोवती पिवळे प्रकाशवलय जाणवले. (४)
३. गळयात कंठाशी असलेला कौत्सुभमणी लाल प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. (३)
४. डोक्यावर असलेल्या शिवपिंडीभोवती पांढरा प्रकाश होता. (१)
५. मकराकार कुंडले पिवळया रंगाच्या प्रकाशाची होती.
६. कटीवर ठेवलेल्या एका हातात असलेला शंख निळा, तर दुसर्‍या हातातील कमळ लालसर रंगाचे जाणवले.
७. रखुमाईला बसण्यासाठी असलेल्या चंद्राकृती जागेत लाल रंगाचे शक्‍तीतत्त्व जाणवले.
८. कमरेला असणारा वासुकीच्या दोर्‍याचा विळखा संपूर्णत: पिवळया प्रकाशाचा होता व त्यातून अनेक चैतन्यलहरी वायूमंडलात प्रक्षेपित होत होत्या. (७)
९. नाभीमध्ये सरस्वतीतत्त्वाचा वास जाणवून तेथे पांढरे कमळ जाणवले. (६)
१०. आज्ञाचक्रातून विजेरीसारखा निळा झोत सगळीकडे फिरत होता. (२)
११. दोन पायांच्या मधे असलेल्या काठीमध्ये कृष्णतत्त्व जाणवून त्या काठीतून प्रक्षेपित होणार्‍या लाल रंगाच्या मारक लहरी पाताळापर्यंत जात असल्याचे व विठोबा एकाच वेळी ऊर्ध्व लोक व अधो लोक यांवर नियंत्रण ठेवत असल्याचे जाणवले. (८)
१२. विठोबाच्या उजव्या पावलावर मुक्‍तकेशी दासीच्या हातांची बोटे रुतलेला ठसा आहे. मुक्‍तकेशी दासीला तिच्या रूपाचा खूप गर्व होता. तिचे गर्वहरण करण्यासाठी पांडुरंगाने अतिशय सुकुमार रूप धारण केले व ते एवढे कोमल होते की, मुक्‍तकेशी त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेतांना तिच्या हातांची बोटे पांडुरंगाच्या पावलात रुतली. त्या ठशात लालसर शक्‍तीप्रवाहाचा बिंदू जाणवला.
१३. विठोबाच्या पायाखाली पुंडलिकाने पांडुरंगाला उभे रहाण्यासाठी फेकलेली वीट आहे. त्या विटेतून दाही दिशांना चैतन्याचे अनेक प्रवाह प्रक्षेपित होतांना जाणवले. विटेकडे पाहून आपोआपच देवाच्या चरणी लीन व्हायला झाले. (९)
- गुरु बोध ११/७/२०१६





टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

सर्वसामान्य ज्योतिष प्रत्येकाला ज्योतिषशास्त्राबद्दल प्रचंड आकर्षण असते. अगदी ज्योतिषीसुद्धा दुसऱ्यां ज्योतिष्याने लिहिलेले स्वतःचे भविष्य वाचतात. तर इतरांची काय कथा. सर्वाना कुंडली / पत्रिका माहित असते. त्यात बारा घरे असतात. त्यात १२ ग्रह असतात. ( रवी तारा आहे. चंद्र उपग्रह आहे. आणि राहूकेतू हे पातबिंदू आहेत.) सर्व सामान्यांना कळण्याकरता सगळ्यांना ग्रह म्हणतात. आणि १२ राशी असतात. म्हणजे ज्योतिषात १२ गुणिले १२ गुणिले १२ = १७२८   इतके सर्वसामान्य योग (combinations ) होतात. आता हे एकेक धरले आहे म्हणून. पुन्हा यात एका  घरात दोन ग्रह, तीन ग्रह असे अष्टग्रही पर्यंत योग असतात. ते दिवसाच्या तासाप्रमाणे १२ स्थानातून जातात. तसेच पहिल्या स्थानातील रास बदलली कि सगळ्या राशी बदलतात. मेषेचा जातक तरतरीत उंच टोकदार नाकाचा तर वृषभेचा ठसठशीत बसक्या नाकाचा असे बदल दिसण्यात नाही तर सगळ्याच बाबतीत होतात. नवीन शिकणाऱ्यानो, र्ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्यानो, प्रश्न जपून विचारात जा. पुस्तक वाचून, चर्चा करून, ऐकून. फेस बुक बार ब्लॉग वर वाचून काहीही प्रश्न विचारू नका. थोडा वि...
ठोकळे, ठोकताळा, अाणि ठोके... सध्या ठोकळा कुंडली, ठोकताळा अाणि माझ्यासारख्या त्याच समर्थन करणाऱ्याना सूक्ष्म अभ्यास करणारे मनापासून ठोकत आहेत.  त्यांना ज्योतिषशास्त्र समजलच नाही अस मी समजतो. समोरच्या समस्येला शास्त्राच्या चॊकटीत बसवून उत्तर देणारे ज्योतिषी नव्हेत.  समस्या ऎकताच ज्याच्या मनात अाकडेमोड होऊन उत्तर येत तो ज्योतिषी. आणि या गोष्टीला अभ्यास लागतो ग्रहांची आकडे मोड नव्हे. हाडाचा शेतकरी धोत्र्याच बी, वांग्याचे बी, आणि मीरचीचे बी नजरेने अोळखतो. त्याला ते चाखावे लागत नाही की वास घ्यावा लागत नाही. तसे ज्योतिषाचे पाहिजे.  पुस्तकात ज्ञान असते, पुस्तके ज्ञानी नसतात आणि सूक्ष्माचा आग्रह धरणारे ज्योतिषाची पुस्तके आहेत. अस माझ मत आहे. नवीन अभ्यास करणाऱ्या लोकांनी अभ्यास करावाच. अभ्यासाला पर्याय नाही. पण स्वतः ला काय वाटते. स्वतः चा ठोकताळा काय ह्यावर भर द्यावा तुमच्याकडे येणाऱ्याला तुम्ही किती किस पाडलाय याची गरज नसते त्याला उत्तर हवे असते आणि इथल्या अभ्यासकांना पटणार नाही पण त्याला चार चांगले शब्द ऎकायचे असतात त्याला तुमच्या भाकीताशी काही घेणे देणे नसते. त्याला माहिती अस...

खंत आहे...

नमस्कार, खरतर इथे खूप काही लिहायचे आहे पण वेळ होत नाही. पेक्षा कंटाळा येतो... बघतो लवकरात लवकर काही तरी मार्ग निघतो का. आभारी आहे....