सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

जून, 2016 की पोस्ट दिखाई जा रही हैं
28 नक्षत्रांची उत्पति व माहिती 28 नक्षत्राचा जन्म श्रीब्रम्हा देवाचे मानस पुत्र श्री दक्ष प्रजापति राजा हे होते. श्री दक्षराजा व त्याची पत्नी प्रसुति देवी या पासुन यांना साठ(60) मुली होत्या. या साठ मुलीतील 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र ह्या  होत्या व त्यातिल एक 28 वे नक्षत्र म्हणजे अभिजीत नक्षत्र हे आहेत हे एकमेव पुरूष नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांचे लग्न (विवाह) चंद्र या ग्रहा सोबत झाला. म्हणून चंद्र ज्या नक्षत्रात आहे ती राशी ग्राह्य मानल्या जाते. चंद्र हा एका नक्षत्रात सव्वा दोन दिवस असतो. या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ग्रह, ज्योतिष, कुंडली या विषयावर माहिती घेतली या लेखात नक्षत्र विषयांवर माहिती घेऊ फार पूर्वी पासून मानव आपल्या जिज्ञासेमुळे निरनिराळ्या विषयांवर विचार करून संशोधन करीत आला आहे. आजपर्यंत मानवाने सर्वच विषयांवर सखोल संशोधन केले आहे. ह्या निरनिराळ्या विषयांपैकी एक विषय होता आकाश. हजारो वर्षापासून म्हणजे आदिमानवापासून अवकाश या विषयावर विचार केला जात आहे. नंतर अवकाश हा वेगळाच विषय बनला आणि ह्या विषयाचा अभ्यास अधिक सोईस्कर व्हावा म्हणून मानवाने अवकाशातील प्रत्येक तार...
ज्योतिष, ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र  सध्या फेसबुक वर ज्योतिष या विषयावर फारच चर्चा होत आहेत. एका दृष्टीने  ते चांगल आहे. आता असणारे ज्योतिषी यांच्या चर्चे मुले उद्या येणाऱ्या ज्योतीशाना ज्योतिषी कसे नसावे हे नक्की कळेल कारण नवीन पिठी जास्त सुज्ञ आहे, एकीकडे ज्योतिष हे अंधश्रद्धा, थोतांड या मताने टीका होतीय. तर दुसरीकडे. मिच  कसा बरोबर, मीच कसा अभ्यासू , मी हे करतो मी ज्योतिष शिकवतो चांगलच शिकवतो. असे स्वान्त सुखाय गोष्टी चालतात. मला कोणाच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही. किंवा कोणी वाईट आहे असे अजिबात म्हणायचे नाही. कारण तसे कोणी नसते... कारण प्रत्येकाला काहीना काही येतच असत म्हणूनच तो पोट तीडिकेने बोलतो . ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासावरून बविष्य - भाकीत वर्तवले जाते आणि आपण जेव्हा भविष्य किंवा भाकीत म्हणतो ते काळाच्या पैकडे डोकावणे असते. आणि काळाच्या पुढे पाहणे याला काहीतरी दैवी अधिष्टान पाहिजे काही तरी तपश्चर्या पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळाच्या पुढे डोकावण्याचा कुणाचे - कशाचे तरी भाकीत वर्तवण्याचा अधिकार पाहिजे. प्रत्येक अधिकार हा अभ्यासाने शिक्षणाने मि...
ठोकळे, ठोकताळा, अाणि ठोके... सध्या ठोकळा कुंडली, ठोकताळा अाणि माझ्यासारख्या त्याच समर्थन करणाऱ्याना सूक्ष्म अभ्यास करणारे मनापासून ठोकत आहेत.  त्यांना ज्योतिषशास्त्र समजलच नाही अस मी समजतो. समोरच्या समस्येला शास्त्राच्या चॊकटीत बसवून उत्तर देणारे ज्योतिषी नव्हेत.  समस्या ऎकताच ज्याच्या मनात अाकडेमोड होऊन उत्तर येत तो ज्योतिषी. आणि या गोष्टीला अभ्यास लागतो ग्रहांची आकडे मोड नव्हे. हाडाचा शेतकरी धोत्र्याच बी, वांग्याचे बी, आणि मीरचीचे बी नजरेने अोळखतो. त्याला ते चाखावे लागत नाही की वास घ्यावा लागत नाही. तसे ज्योतिषाचे पाहिजे.  पुस्तकात ज्ञान असते, पुस्तके ज्ञानी नसतात आणि सूक्ष्माचा आग्रह धरणारे ज्योतिषाची पुस्तके आहेत. अस माझ मत आहे. नवीन अभ्यास करणाऱ्या लोकांनी अभ्यास करावाच. अभ्यासाला पर्याय नाही. पण स्वतः ला काय वाटते. स्वतः चा ठोकताळा काय ह्यावर भर द्यावा तुमच्याकडे येणाऱ्याला तुम्ही किती किस पाडलाय याची गरज नसते त्याला उत्तर हवे असते आणि इथल्या अभ्यासकांना पटणार नाही पण त्याला चार चांगले शब्द ऎकायचे असतात त्याला तुमच्या भाकीताशी काही घेणे देणे नसते. त्याला माहिती अस...